नवी दिल्ली : वाढत्या महागाईमूळे देशभरातील सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांसहिती भाजीपाल्याच्या किंमतीतही वाढ होत चालली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजीपाल्यांचे वाढते दर कमी होण्यासाठी याआधीही देशभरात आंदोलने झाली. आताही होत आहेत.


या किंमती वाढण्यामागची कारणे आपण जाणून घेऊया


अवकाळी पाऊस 


> अपुऱ्या आणि अवकाळी पावसामूळे मोठमोठ्या शहरांमध्ये कांद्याचा सप्लाय अर्धवट झाला.


> २२ ऑक्टोबर रोजी देशात टोमॅटोची आवाक ६० हजार टन होती.


> एक आठवड्यात टोमॅटोची आवाक २० हजार टन घटली.


> कांद्याचे उत्पादन २१७ लाख टन्स राहण्याची शक्यता आहे.


> गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ८ लाख टन कांद्याचे उत्पादन अधिक झाले आहे.


 
 का महाग झाल्या भाज्या ?


> काही राज्यात खूप पाऊस झाल्याने टॅमेटो, कांदा उत्पादनावर वाईट परिणाम झाला. 
 
> पुरवठयाची साखळी, स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर यांची कमतरता यामूळे भाजीपाल्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.


> नोटबंदी आणि जीएसटीनंतर व्यापारी सतर्क होऊन काम करीत आहेत. 


> एका मर्यादे पलीकडे रोख व्यवहार करण्यावर बंदी असल्याने भाज्यांच्या किंमतींनी उसळी घेतली आहे.