मुंबई : VIRAL VIDEO : जीव वाचवण्याची वेळ जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात येते तेव्हा त्याच्या आत एक वेगळीच शक्ती येते. असेच काहीसे एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. (Rabbit Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक ससा आपला जीव वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर धावताना दिसत आहे. सशाने जीव वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्याच्या मागून एक ट्रेन येताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. 


ससा जीव वाचवण्यासाठी सर्व शक्तीनिशी धावत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. धावत-पळता तो एका जागी येतो जिथे तो ट्रॅकच्या बाहेर येतो आणि त्याचा जीव वाचतो.


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की ट्रेनचा ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी बसलेले कोणीतरी एकमेकांशी बोलत आहेत. 


दोघेही सशाबद्दल बोलताना ऐकले आहेत. तुम्ही पाहू शकता की, एक वेळ अशी येते जेव्हा ससा आणि ट्रेनमधील अंतर खूपच कमी होते. यावेळी ट्रेन सशाला ओव्हरटेक करेल असे वाटते.


पहा व्हिडिओ



ट्रेन ड्रायव्हरने कमी केली गती


सशाचा जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हर ट्रेनची स्पीड कमी करतात. तेव्हा ससा आपला जीव वाचवून ट्रॅकच्या बाहेर पडतो.


सोशल मीडियावर लोक ड्रायव्हरचे जोरदार कौतुक करत आहेत. ससा जीव वाचवण्यासाठी धडपडताना पाहून ड्रायव्हरने हॉर्न वाजवून सशाला इशारा केल्याचे ऐकायला मिळते.


हा व्हिडिओ फेसबुकवर Viral Hog नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडिओला खूप पसंती देत आहेत