नवी दिल्ली : ज्या करदात्यांनी ऑडिट रिपोर्ट जमा केलाय त्यांच्यासाठी सरकारने मंगळवारी रात्री आयकर रिटर्नची ई-फायलिंगची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने मुदत वाढवण्याच्या विविध मागण्यांनंतर हा निर्णय घेतला आहे. ही आयकर रिटर्नसाठी दुस-यांदा मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी ३० सप्टेंबरला ही मुदत संपणार होती. पण नंतर ती ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. 


ऑनलाईन रिटर्न फाईल करणे सोपे 


ऑनलाईन रिटर्न फाईल करणे खूप सोपे झाले आहे. सर्वात मोठी खासियत म्हणजे लाईनमध्ये उभे राहण्यापासून तुम्ही वाचता आणि सोबतच याद्वारे रिफंडही त्वरीत मिळतात. तसे तुम्ही रिटर्न प्रायव्हेट वेबसाईट द्वारेही करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. हेच काम मोफत करायचे असेल तर आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या साईटवरून करू शकता. 


आयटी रिटर्न भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे -


नोकरदार वर्गाला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना जनरली फॉर्म १६, बॅंक खात्यांवर मिळणारे व्याज आणि टीडीएस सर्टिफिकेटसोबतच आणखी काही कागदपत्रे द्यावे लागतात. जर तुम्ही गेल्या आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल तर मागील आणि आत्ताचे फॉर्म १६ घेणे गरजेचे आहेत.