मुंबई : सध्याची परिस्थिती पाहाता कोरोना व्हायरसने जगात हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षापासून अनेकांचा बळी घेतलेला हा विषाणू पुढच्या दशकभरात ताप-सर्दीसारखा सामान्य होणार असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. कोरोना विषाणूचा शरीरावर होणार परिणाम यांच्या गणितीय दृष्टीने अभ्यास केल्यानंतर असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आताचा तिव्र कोरोना येत्या काही वर्षांमध्ये सामान्य  होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे कोरोना हा धोकादायक विषाणू मानवी शरीरावर आणि रोगप्रतिकारशक्तीवर कशा पद्धतीने परिणाम करतो याचा अभ्यास करण्यात आला आहे. अमेरिकेच्या  उटाह विद्यापीठातले गणित आणि जैवविज्ञानाचे प्राध्यापक फ्रेड ऍडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आता  करण्यात आलेल्या संशोधनावरून असं लक्षात आलं आहे की, भविष्याबद्दल कोणताही अंदाज बांधण्यात आला नाही.'



ते पुढे म्हणाले, 'येत्या काही वर्षांमध्ये कोरोना व्हायरसची तिव्रता कमी होईल. कारण तेव्हा आपल्या सर्वांमध्ये कोरोनाला लढा देण्याची क्षमता तयार झालेली असेल.' शिवाय  प्रत्येकाच्या रोगप्रतिकारशक्तीमुळे आजारात बदल होतात.  SARS-CoV-2 या प्रकारातल्या विषाणूबद्दल आपल्याला आत्ता समजलं आहे.


दरम्यान 19व्या शतकात देखील रशियन फ्लूची लाट आली होती. पण कालांरताने रशियन फ्लूची लाट ओसरली. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये कोरोना देखील सामान्य होईल असं सांगण्यात आलं आहे. 'जेव्हा या धोकादायक विषाणूचं जाळं हळूहळू सर्वत्र पसरत होतं. तेव्हा व्हायरसबद्दल कोणाला माहिती नव्हती शिवाय आजारावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती देखील तयार नव्हती.' असं ऍडलर म्हणाले.