काश्मीर : हांदवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली आहे. नॉर्थ काश्मीरच्या पाजीपोरा भागात ही चकमक सुरू आहे. मिळलेल्या माहितीनुसार सुरूवातीला एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भरतीय जवानांना यश मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे या चकमकीत सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश लागलं आहे. खोऱ्यातील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेला हिजबुल दहशतवादी मेहराजुद्दीनला जवानांनी ठार केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगायचं झालं तर, मेहराजुद्दीन उर्फ उबैद हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वात जुना कमांडर होता. हांदवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चकमक पोजीपोरा भागात सुरू आहे. पोलीस, सैन्य आणि सीआरपीएफ यांच्याकडून त्या भागात सर्च अद्यापही ऑपरेशन सुरू आहे. सामान्य नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून हा परिसर रिकामा करण्यात आला आहे.


काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितलं की, मेहराजुद्दीन खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून दहशदवादी हल्ले करण्यासाठी कट रचत होता. चकमकीत त्याला ठार मारल्यामुळे सुरक्षा जवानांना मोठं यश आलं आहे.  मेहराजुद्दीन हिजबुलचा सर्वात जुना आणि टॉप कमांडर होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी संघटनेसाठी कार्यरक होत्या.