The young man threatened to minor girl : आफताबने (Aaftab Poonawala)  रागाच्या भरात श्रद्धाचे 35 तुकडे केले आणि तिच्या प्रेमाचा अंत केला. या घटनेमुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. श्रद्धा वालकर (shraddha walker) प्रकरण ताजं असताना एका तरुणाने अल्पवयीन मुलीला 'श्रद्धासारखे तुकडे करेन' अशी धमकी दिली आहे. तरुणाच्या धमक्यांना घाबरुन पीडितेने शाळेत जाणं देखील बंद केलं आहे. धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर तरुणाने तिच्या घराबाहेरुन धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'श्रद्धासारखे तुझे देखील 36 तुकडे करेन आणि जंगलात फेकून देईल. तुम्ही माझ्या विरोधात पोलिसांत विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. तुमच्या मुलीला घरातून उचलून तिचे 36 तुकडे करेन. मला कोणीही काहीही करु  शकत नाही.' असं म्हणत पीडितेला धमकावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. (young man threatened to minor girl)


पीडिता घराबाहेर निघाल्यावर तरुण करायचा पाठलाग


मिळालेल्या माहितीनुसार, तरुण 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करायचा. घरातून बाहेर पडताच शाळा, क्लासपर्यंत तिचा पाठलाग करायचा. पडितेच्या वडिलांनी शोहदे मोहम्मद फैझ विरोधात विनयभंगची तक्रार दाखल केली आहे. (threatening messages)


पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतरही तरुण शांत बसला नाही. तो पीडितेच्या घराबाहेरून तिला धमकी देवू लागला. 'माझ्यासोबत लग्न (minor marriage) कर नाहीतर तुला जीवे मारेन. श्रद्धासारखे तुझे देखील तुकडे करेन.' (child marriage act in india) एवढंच नाहीतर तरुणाने पीडित मुलीच्या भावाला देखील मारहाण केली.  तरुणाच्या धमक्यांना घाबरुन पीडित मुलीच्या कुटुंबाने घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. (minor girl marriage case)


तरुणाच्या धमक्यांना घाबरुन पीडित मुलीच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कागदावर तक्रार नोंदवली पण कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याची माहिती समोर येत आहे. जेव्हा तरुण पीडित मुलीच्या घराबाहेरुन धमक्या देवू लागला तेव्हा पोलिसांनी तरुणाला अटक केली. ही घटना उत्तर प्रदेश मधील कानपूर येथील आहे.