मुंबई : चोरांनी चोरी करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेलच. ज्यामध्ये चोर पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तु चोरी करत असल्याचे आपण पाहिले आहे. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा काही वेगळा आहे. यामध्ये दोन चोर दारुची बाटली चोरी करण्याचा प्लान आखतात परंतु त्यांचा प्लान पुर्ता फसतो, कारण ते जी बाटली महागडी दारुची बाटली म्हणून चोरी करतात, खरंतक ती बाटली स्वस्तातली आणि फेक दारु असते.


नक्की प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉक्स 26 ह्यूस्टनने वृत्त दिले आहे की, ही घटना 23 मे रोजी घडली, तीन अज्ञात पुरुष दारूच्या दुकानात शिरले आणि त्या दुकानात फेऱ्या मारु लागले. तेथे प्रदर्शनासाठी लावलेल्या बाटल्यांना आणि त्यांच्या किंमतींना या चोरांनी नीट पाहिलं आणि त्यातील महागातली, म्हणजेच 4,200 डॉलरच्या (3 लाख रुपयांच्या) दारुच्या बाटलीला उचलून नेण्याचं त्यांनी ठरवलं.


या चोरट्यांनी या बाटलीबद्दल त्याच्या दुकातील कर्मचाऱ्यांकडे विचारपुस केली. ज्यामुळे सॅम्पल दाखवण्यासाठी कर्मचाऱ्यांने डिस्प्ले कॅबिनेटचे कुलूप उघडले.


कर्मचाऱ्याने कॅबिनेट उघडताच त्यातील एकाने बाटली हिसकावून घेतली, तर दुसऱ्या व्यक्तीने त्याच दारूचे दुसरे बॉक्स उचलले आणि बाहेर निघून गेले.


अहवालानुसार, दारूच्या दुकानाने सांगितले की एकाने घेतलेली वाइनची बाटली बनावट होती. त्यांनी फक्त डिस्प्ले वर ठेवण्यासाठी ही बनावट बाटली वापरली होती. त्यामुळे दुकानवाल्याचं फारसं नुकसान झालं नाही, परंतु असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली. पोलीस या तिन्ही चोरांचा शोध घेत आहेत.


ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना जेव्हा या बाटलीचे सत्य कळाले तेव्हा सर्वांना चोरांच्या या परिस्थीतीवर हसू येत आहे.