भोपाळ : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर सगळेच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. स्व. लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमी स्थापन केली जाईल. लताजींनी जी काही गाणी गायली ती सर्व गाणी उपलब्ध असणारे एक संग्रहालय बांधण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे. इंदूरमध्ये स्व. लता मंगेशकर यांचा पुतळा बसविण्यात येईल. दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी स्व. लता मंगेशकर पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.


 



लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी “स्वर कोकिळा लता मंगेशकर जी आता नाहीत. दीदी तुमच्याशिवाय हा देश उजाड आहे, गाणी आणि संगीत शांत झालंय. तुम्हाला संगीत आणि संगीताची देवी मानून तुमची उपासना करत राहीन" असं म्हटलं होतं.