मुंबई : कोरोनाचा  (Coronavirus) पुन्हा धोका वाढला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवीन मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी केल्या आहेत. काही जुने नियम कायम ठेवत या नव्या गाईडलाईन्स लागू केल्यात आहेत. यात केंद्र सरकारने मॉल्स, धार्मिक स्थळे आणि हॉटेल्ससाठी नव्या दिशानिर्देशांची घोषणा केली. (Corona Guidelines)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लोकांना काळजी घेण्यास सांगितले आहे. हात साबणाने धुवा, मास्क वापरा आणि फिजिकल अंतर राखा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच खबरदारी म्हणून सार्वसनिक ठिकाणांसाठी काही सूचना दिल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने म्हटलेय, महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या सहा राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या सहा राज्यांमध्ये एकूण 85 टक्के रुग्ण संख्या आहे.
त्यामुळे या राज्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


धार्मिक स्थळांसाठी मार्गदर्शक सूचना


- धार्मिक स्थळात प्रवेश करताना थर्मल स्क्रिनिंग अत्यावश्यक
- कोरोनासदृश्य लक्षणे नसलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येईल
- मास्क नसलेल्या भाविकांना प्रवेश नाही
- कोरोनाचे नियमांचे पालन करण्यास सांगणारे पोस्टर मुख्य ठिकाणी लावणे गरजेचे आहे.


मॉलसाठी मार्गदर्शक सूचना



- मॉलमध्ये योग्य ती खबरदारी घ्या. कोरोना नियमांचे पालन व्हावे यासाठी पुरेसे मनुष्यबळ असावे
- कोरोनाचा धोका जास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी
- अशा कर्मचाऱ्यांनी थेट लोकांच्या संपर्कात येऊ नका
- कर्मचारी आणि ग्राहकांसाठी वेगवेगळे एंट्री आणि एक्झीट असावी
रेस्तराँसाठी गाईडलाईन्स


हॉटेल्ससाठी मार्गदर्शक सूचना


- शक्यतो पार्सल घेऊन जाण्यासाठी सांगावे, फूट डिलिव्हरी करताना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे
- होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य
-.पार्किंग किंवा अन्य ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी खबरदार घ्यावी. 
- रेस्तराँमध्ये प्रवेश करताना असलेल्या रांगेसाठी 6 फूट अंतराचे पालन करणे आवश्यक