देशात कोरोनाची तिसरी लाट नाही? ICMRचा मोठा खुलासा
कोरोनाच्या दुसऱ्यालाटेने देशात हाहाकार माजवला आहे.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचे संकेत दर्शवण्यात आले आहेत. त्यामुळे सरकार महत्त्वपूर्ण पाऊल उचलतं आहे. तिसऱ्या लाटेसंदर्भात ICMR आणि Imperial College लंडनने एक संयुक्त रिपोर्ट तयार केला आहे. देशात कोरोनाची तिसरा लाट येण्याची शक्यता फार कमी आहे असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. संयुक्त रिपोर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा देखील करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार फक्त चार कारणांमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येवू शकते. कोरोना लाटेचं पहिलं कारण म्हणजे ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही. लस न घेतल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती फार कमी होते. दुसरं आणि धक्कादायक कारण म्हणजे व्हायरसचा नवा व्हेरिएन्ट. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएन्ट आल्यास त्याचा रोगप्रतिकार शक्तीवर फार गंभीर परिणाम होवू शकतो.
कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएन्ट आल्यास तो जुन्या व्हेरिएन्टच्या तुलनेत अधिक फैलू शकतो. हे तिसऱ्या लाटेचं तिसरं कारण आहे. चौथ कारण म्हणजे होत असलेलं अनलॉक. अनलॉकमुळे लोक रस्त्यांवर गर्दी करत आहेत. या चार कारणांमुळे कोरोना पुन्हा तिसऱ्या लाटेच्या रूपात हाहाकार माजवू शकतो असं संयुक्त रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.