कोरोनाचा लवकरच होणार नायनाट! कायमची कटकट मिटणार; IIT शास्त्रज्ञाचे दिलासादायक भाकित
Third Wave Of Coronavirus : आयआयटी कानपूरच्या एका प्राध्यापकाने दावा केला आहे की दक्षिण आफ्रिकेप्रमाणे ओमिक्रॉनचा भारतावर फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही.
कानपूर: आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोना विषाणूची तिसरी लाट एप्रिलपर्यंत संपेल. परंतू, तज्ज्ञांनी इशारादेखील दिला की निवडणुकीच्या प्रचार रॅली या कोरोना संसर्गासाठी सुपर स्प्रेडर ठरू शकतात. कारण प्रचार रॅलीमध्ये कोविड प्रतिबंधक नियम पाळणे शक्य नाही.
संसर्गाचा धोका
प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोविड प्रोटोकॉल न पाळता मोठ्या संख्येने लोकं प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले तर, कोरोनाच्या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
देशातील कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार?
आपल्या गणितीय मॉडेलच्या आधारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संसर्गाची भविष्यवाणी करणारे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारीमध्ये भारतात तिसरी लाट येईल आणि मार्चमध्ये दररोज 1.8 लाख रुग्ण येऊ शकतात.
तिसरी लाटेबाबत दिलासादायक बाब स्पष्ट करताना ते म्हणाले की, रुग्णांमध्ये 10 पैकी फक्त 1 रुग्णाला रुग्णालयाची गरज असेल. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत देशात 2 लाख बेड्सची देखील गरज भासू शकते.
80 टक्के लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती
अग्रवाल पुढे म्हणाले की, आफ्रिका आणि भारतातील 80 टक्के लोकसंख्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. दोन्ही देशांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती 80 टक्क्यांपर्यंत आहे.
दक्षिण आफ्रिकेप्रमाणे भारतावरही ओमिक्रॉनचा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही, असा दावा त्यांनी केला.