नवी दिल्ली : लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचं सौभाग्य प्रत्येकाला नाही मिळत. फक्त देशाचे पंतप्रधान 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर झंडा फडकवतात. प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला देशाचे पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवतात आणि देशाला संबोधित करतात. पण इतिहासात असे देखील पंतप्रधान आहेत ज्यांना लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याची संधी नाही मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- गुलजारी लाल नंदा आणि चंद्रशेखर हे असे पंतप्रधान होते ज्यांना एकदाही लाल किल्ल्यावर झेंडा फडवण्याची संधी नाही मिळाली. गुलजारी लाल नंदा दोन वेळा देशाचे पंतप्रधान झाले पण त्यांना ही संधी एकदाही नाही मिळाली. पण असे अनेक पंतप्रधान आहेत ज्यांना 10 पेक्षा अधिक वेळा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं आहे. 


- जवाहर लाल नेहरू यांना 15 ऑगस्ट 1947 ते 1964 पर्यंत लागोपाठ 17 वेळा लाल किल्ल्यावर तिंरगा फडकवला. नेहरुंना पहिल्यांदा 15 ऑगस्टला नाही तर 16 ऑगस्ट 1947 ला तिरंगा फडकवला होता.


- यानंतर इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरुन 16 वेळा तिरंगा फडकवला आहे. 1966 ते 1977 दरम्यान त्यांनी लागोपाठ 11 वेळा तिरंगा फडकवला आहे.


- इंदिरा गांधी यांच्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 10 वेळा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवला आहे.


- अटल बिहारी वाजपेयी हे सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवणारे काँग्रेसचे नसेलेले पंतप्रधान आहे. त्यांनी 6 वेळा तिरंगा फडकवला आहे.


- राजीव गांधी आणि नरसिंह राव यांना 5 वेळा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवला आहे. 


- चौधरी चरण सिंह, वीपी सिंह, एचडी देवेगौडा, इंद्र कुमार गुजराल, लाल बहादूर शास्त्र यांनी एकदा तर मोरारजी देसाई यांनी दोन वेळा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं आहे.