Kathi Roll Video: आपल्या सर्वांनाच नानाविध पदार्थ चाखण्याची आवड असते. मग ते गोड पदार्थ असो वा तिखट. सर्व तऱ्हेचे पदार्थ खायला आपल्याला आवडतातच. त्याहून हल्ली क्रेझ आहे ती स्ट्रीट फूडची आणि त्यातून जर रोल किंवा फ्रेंकी असेल तर आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही काठी रोल नक्कीच खाल्ला असेल पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. अशा एका फुड ब्लोगरने काठी रोल बनवतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. 


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस मोठा पराठा लाटताना दिसेल. तो भाजून झाल्यानंतर त्यात तो आतील मिश्रण (Chowmein) भरतो. हा पराठा दुसरा तिसरा नसून कोणता नसून तो काठी रोल (Kathi Roll) आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चीज, सोयाबीन आणि कांदा यासह काही भाज्या वापरून हा रोल बनतो. यात वेगवेगळ्या प्रकारचे सॉसही वापरले जातात. यावर लिंबू आणि चाट मसालाही घातला जातो. पराठा दुमडून फॉइलने गुंडाळून सर्व्ह केला जातो. एवढा मोठा काठी रोल पाहून तुम्हालाही स्वतःवर नियंत्रण ठेवता येणार नाही.