Multibagger stock: हल्ली सगळ्यांना सतावणारा प्रश्न म्हणजे कुठल्या शेअर मधून किती फायदा मिळेल?, त्यातून सतत वर खाली होत असलेल्या या शेअर मार्केटवर लक्ष ठेवणेही कठीणच असते तेव्हा कुठल्या शेअर मध्ये किती फायदा आहे?, हे जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ओरिएंट बेल लिमिटेड' ही कंपनी सध्या तूमच्या फायद्याची आहे. ही कंपनी सिरेमिक आणि फ्लोर टाइल्सची निर्मिती, ट्रेडिंग आणि विक्री करतेय. 'ओरिएंट बेल लिमिटेड' देशातील टॉप प्रीमियम फ्लोअर टाइल्स आणि वॉल टाइल्स ऑफर करत आहे. 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या इक्विटी शेअर्सवर 1 रुपये डेविडंट कंपनीने जाहीर केला आहे. यासाठी 13 जुलै 2022 ही एक्स-डेट ठेवण्यात आली आहे. 


या S&P BSE Smallcap कंपनीने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स दिले ज्यात त्यांचा स्टॉक 123 टक्क्यांनी वाढला. गेल्या वर्षी 14 जुलै रोजी त्यांच्या शेअरची किंमत 332.45 रुपये होती जी 12 जुलै 2022 ला 742.90 रुपये एवढी राहिली होती. वर्षभरापूर्वी जर तुम्ही त्यात एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 2.23 लाख रुपये झाली असती, हे नक्की.  


गेल्या एका वर्षात या शेअरने बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सलाही मागे टाकले आहे. गेल्या वर्षभरात त्याचा इंडेक्स हा 1.78 टक्क्यांनी घसरला आहे. 14 जुलै 2021 रोजी तो 26,251.10 वर होता, परंतु 12 जुलै 2022 रोजी तो 25,781.41 वर आला. 'ओरिएंट बेल लिमिटेड'च्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांवर नजर टाकली तर कंपनीचा रेव्हन्यू मागील वर्षाच्या तुलनेत 18.5 टक्क्यांनी वाढून 213 कोटी रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे कंपनीचं प्रॉफिट 102 टक्क्यांनी वाढून 16.19 टक्क्यांवर पोहोचलं आहे.