मुंबई : सध्या रेडी टू इट प्रोडक्टची चांगली मागणी आहे. त्याचा फायदा या क्षेत्रातील कंपन्यांना होत आहे. तसेच या कंपन्यांचे शेअरदेखील मजबूत होत आहेत. रेडी टू इट प्रकारच्या प्रोडक्ट कंपन्यांमध्ये काही चांगल्या कंपन्या आहेत. ज्यांची चर्चा कमी होत असते. परंतु त्यांचे फंडामेंटल्स उत्तम आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना भरपूर परतावा देण्याची क्षमता ठेवतात. असाच एक Bambino Agro शेअर झी बिझनेसचे व्यवस्थापकीय संपादक अनिल सिंगवी यांनी निवडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल सिंघवी यांचे म्हणणे आहे की, सध्याच्या काळात खाद्य पदार्थांच्या कंपन्यांचे स्टॉक ऍक्शनमध्ये आहेत. काही कंपन्या बाजारात आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. या सेक्टरमध्ये चांगली स्पेस दिसून येत आहे. त्याचा फायदा Bambino Agro ला मिळणार आहे. दक्षिणेत कंपनीचे नेटवर्क चांगले आहे. कंपनीला आपल्या फिल्डमध्ये 35 वर्षाचा अनुभव आहे. प्रमोटर्स कंपनीमध्ये कमाल भागिदारीमध्ये आहेत. 


या कंपनीच्या स्टॉकची ग्रोथ रेकॉर्ड पाहिल्यास मागील 3 वर्षात कंपनीच्या उत्पन्नात 19 टक्के सीएजीआर आणि नफ्यात 31 टक्के सीएजीआर ग्रोथ राहिली आहे. कंपनीच्या प्रोडक्टची डिमांड वाढतेय. पुढील दोन वर्षात कंपनीचा ईपीएस दुप्पट होऊ शकतो. 2 वर्षात ही कंपनी गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट करू शकते. सध्या हा शेअर 345 च्या आसपास ट्रेड करीत आहे. शॉर्ट टर्मसाठी 450 रुपये तर लॉंग टर्म साठी 600 रुपयांचे लक्ष या शेअरमधील गुंतवणूकीसाठी ठेवता येईल.