उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath)  यांना पुन्हा एकदा बॉम्बने (Bomb) उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वीही योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवरुन (whatsapp) ही धमकी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्याने आपलं नाव शाहिद असल्याचे सांगितले आहे. तसेच तीन दिवसांत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.


व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज पाठवून धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव शाहिद असे सांगितले आणि सांगितले की तीन दिवसांत बॉम्बने उडवले जाईल. 


याप्रकरणी सुशांत गोल्फ सिटी कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उडवून देण्याची धमकी दिली. पोलीस नियंत्रण कक्ष 112 च्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. माहिती मिळताच ऑपरेशन कमांडर सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.


सुशांत गोल्फ सिटीचे प्रभारी निरीक्षक शैलेंद्र गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपी 112 मुख्यालयात ऑपरेशन कमांडर म्हणून नियुक्त सुभाष कुमार यांनी तक्रार केली होती की, मुख्यालयाच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एक मेसेज आला होता आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली.


उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. गोरखपूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटकही केली होती. एका ट्विटर अकाउंटवरून ४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.