जम्मू काश्मिर :  उत्तर काश्मिरच्या हंडवारा भागात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. हे तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे नागरिक असावेत, असा दावा पोलीस महासंचालक एस. पी. वेद यांनी केला. 


   
  सुरक्षा यंत्रणांची कारवाई 


  
   हंडवाराच्या उनिसू गावात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. तेव्हा झालेल्या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी तिघा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांचा साठाही जप्त करण्यात आला. दरम्यान, शोपियामध्ये दहशतवाद्यांनी चालत्या वाहनातून केलेल्या गोळीबारात जम्मू आणि काश्मीर बँकेचे दोन सुरक्षा जवान ठार झाले.