ब्रिटिशांविरुद्ध लढताना टीपू सुल्तानला वीरमरण - राष्ट्रपती कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक विधानसभेत टीपू सुल्तानवर कौतुकाचा वर्षाव केला... राष्ट्रपती कोविंद यांनी टीपू सुल्तान एका करारी योद्धा असल्याचं म्हटलं.
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक विधानसभेत टीपू सुल्तानवर कौतुकाचा वर्षाव केला... राष्ट्रपती कोविंद यांनी टीपू सुल्तान एका करारी योद्धा असल्याचं म्हटलं.
'ब्रिटिशांविरुद्ध लढताना टीपू सुल्तानला वीरमरण प्राप्त झालं... ते विकासाचे प्रणेता होते.... आणि त्यांनी युद्धात मैसूर रॉकेटचाही वापर केला होता. ही तंत्रपद्धती नंतर युरोपवासियांनी आत्मसात केली' असं राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, कर्नाटक सरकारद्वारे टीपू सुल्तान जयंती साजरी करण्यावर वादंग उभा राहिल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती कोविंद यांची ही भूमिका महत्त्वाची
ठरतेय. ते कर्नाटक विधानसभेच्या संयुक्त सत्राला संबोधित करत होते.
कर्नाटक सरकार १० नोव्हेंबर रोजी टीपू सल्तान जयंती साजरी करणार आहे. २० ऑक्टोबर रोजी मोदी सरकारमधील केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी टीपू सुल्तान एक बलात्कारी आणि हत्यारा राजा असल्याचं म्हणत या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रण धाडू नये, असं म्हटलं होतं.