मुंबई: गाडी कोणतीही असो नियमित सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. काहीवेळा आपण पैसे खर्च होतील या भीतीनं ते टाळतो. एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दैव बलवत्तर म्हणून तरुण यामध्ये वाचल्याचं दिसत आहे. गॅरेजमध्ये टायरमध्ये हवा भरण्याचं काम सुरू होतं. त्याच दरम्यान टायरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची भीषणता एवढी होती की तिथले लोक हवेत उडून खाली पडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात काही लोक टायरजवळ उभे आहेत. टायरमध्ये हवा भरत असताना भीषण स्फोट झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा इतका भयानक स्फोट होता की टायरजवळ असलेले प्रत्येकजण हवेत उडून खाली कोसळला. 



हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला या स्फोटाची भीषणता लक्षात येईल. हा व्हिडीओ कुठला आहे याची नेमकी माहिती मिळू शकली नाही. हा व्हि़डीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. अशा गॅरेजमध्ये जात असाल तर काळजी घ्या आणि आपल्या गाडीची सर्व्हिसिंग नियमित करा ज्यामुळे अशा गोष्टी टाळल्या जाऊ शकतात. 


विशेष सूचना- हा व्हिडीओ व्हायरल व्हिडीओ आहे झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही.