Tirupati Laddu Making : तिरुपती बालाजी.... दक्षिण भारतातील  एक प्रसिद्ध देवस्थान त्यांचं व्यवस्थापन आणि कार्यकारिणीसह श्रीमंतीमुळंही कायमच चर्चेचा विषय ठरलं. असं हे देवस्थान किंबहुना तिथं भाविकांना दिला जाणारा प्रसाद एका वेगळ्या कारणामुळं सध्या चर्चेचा, वादाचा विषय ठरत आहे. निमित्त आहे ते म्हणजे त्यामध्ये मिसळली जाणारी सामग्री. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर दिवशी लाखोच्या संख्येत तयार केल्या जाणाऱ्या या लाडूमध्ये मत्सतेल आणि जनावरांच्या चरबीचे अंश आळल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय किनारही मिळताना दिसत आहे. एकिकडे भाविकांच्या भावना दुखावल्या जात असल्याची माहिती असतानाच आता हे लाडू नेमके कसे तयार होतात याविषयी जाणून घेण्यासाठीसुद्धा अनेकांनीच काही प्रश्न उपस्थित केले. 


कुठे आणि कसे तयार होतात हे लाडू? 


उपलब्ध माहितीनुसार तिरुपती देवस्थानी प्रसाद म्हणून दिले जाणारे हे लाडू अतिशय शुद्धतेच्या पद्धतीनं तयार केले जातात. लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याला दित्तम म्हणतात, तर जिथं हे लाडू तयार केले जातात त्या ठिकाणाला लड्डू पोटू म्हणतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये इथं प्रसाद तयार करण्यासाठी लाकडाचा वापर केला जात असे. पण, 1984 नंतर इथं एलपीजी गॅसचा वापर सुरु झाला. अहवालातील आकडेवारीनुसार दर दिवशी इथं 3.5 लाख ते 5 लाख लाडू बनवले जातात. 


हे लाडू सामान्यत: पूर्ण वर्तुळाकार नसून, साधारण अंडाकृती असतात. जवळपास 1715 वर्षापासून हे लाडू तयार केले जात असून, त्यांच्या पाककृतीमध्ये 6 वेळा बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या घडीला हे लाडू साखर, काजू, वेलची, साखरेचा पाक, मनुके आणि बेसनपासून तयार केले जातात. साधारणत: त्यासाठी 10 टन बेसन, 10 टन साखर, 700 किलो काजू, 150 किलो वेलची, 300 ते 400 लीटर तूप, 500 किलो पाक, 540 किलो मनुके दर दिवशी वापरले जातात. या सामानांसाठीही देवस्थान विश्वस्त मंडळानं टेंडर काढले आहेत. 


हेसुद्धा वाचा : तिरुपतीच्या लाडूत केवळ चरबीच नाही तर...राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासा


 


देवाच्या प्रसादात इथं तीन प्रकारचे लाडू असतात. यामध्ये Proktham, Asthanam आणि Kalyanotsavam अशा प्रकारांचा समावेश आहे. Proktham प्रकारातील लाडू लगान असून, एकाचं वजन 60 ते 75 ग्राम इतकं असतं, बहुतांश भाविकांना हेच लाडू दिले जातात. तर, Asthanam प्रकारचे लाडू सणासुदीच्या दिवसांमध्ये तयार केले जातात. हा  एक लाडू 750 ग्राम वजनाचा असतो. सर्वात शेवटचा म्हणजेच Kalyanotsavam लाडू त्याच व्यक्तींसाठी तयार केला जातो जे Kalyanotsavam मध्ये सहभागी होतात. 


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मंदिराच्या कमाईचा तिसरा मोठा स्त्रोत म्हणजे ये लाडूच असून, त्यामाध्यमातून साधारण 500 ते 600 कोटी रुपयांची कमाई होते. ऑनलाईन पद्धतीपासून मंदिरातही हेच लाडू प्रसाद स्वरुपात दिले जातात, ज्यांची किंमत नगास 50 रुपये इतकी आहे.