कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य!, तीन तलाकवर मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य
तीन तलाकवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. मात्र, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमधील एका मंत्र्याला हा निर्णय फारसा रूचला नाही. या मंत्रीमहोदयांनी थेट कोर्टाच्या निर्णयालाच घटनाबाह्य ठरवले आहे.
कोलकाता : तीन तलाकवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. मात्र, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमधील एका मंत्र्याला हा निर्णय फारसा रूचला नाही. या मंत्रीमहोदयांनी थेट कोर्टाच्या निर्णयालाच घटनाबाह्य ठरवले आहे.
सिद्दुकुल्ला चौधरी असे या मंत्री महोदयांचे नाव असून, ते ममता सरकारमध्ये लायब्ररी मंत्री आहेत. तसेच, पश्चिम बंगालमधील जमीयत उलेमा हिंदचे अध्यक्षही आहेत. चौधरी यांनी थेट न्यायालयाच्या निर्णयालाच आव्हान देणारे वक्तव्य करत हा निर्णय घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. अगोदरच विरोधकांच्या रडारवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत या मंत्र्यांच्या विधानामुळे अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.
चौधरी यांनी म्हटले आहे की, सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांना इस्लाममधील अंतर्गत बाबतीत निर्णय देण्याचा अधिकार नाही. पत्रकार परिषदेत बोलताना चौधरी बोलत होते. सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय घटनाबाह्य आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय मानणार नाही. आमच्या सेंट्रल कमिटीची आज दिल्लीत बैठक होईल या बैठकीनंतर पूढील दिशा स्पष्ट केली जाईल, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.