मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला (West Bengal Election 2021) काहीशे दिवस राहिले आहेत. अशावेळी अनेकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. याकरता व्हिडिओ, फोटोजची मदत घेतली जाते. असाच एक व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालमधून समोर आला आहे. (TMC MP Kalyan Banerjee cheeky behaviour invites sexism charge from BJP Locket Chatterjee) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगालमधील भाजप (BJP MP) खासदार लॉकेट चॅटर्जी (Locket Chatterjee) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडिओत टीएमसी (TMC) खासदार एका पत्रकार परिषदेत सगळ्यांसमोर महिला आमदाराचे गाल ओढताना दिसत आहे. 



हा व्हिडिओ कधीचा आणि कुठचा आहे. यावर अद्याप काही माहिती मिळालेली नाही. मात्र लॉकेट चॅटर्जींचा असा दावा आहे की, ही व्यक्ती टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी आहेत. लॉकेट चॅटर्जी यांनी ट्विटवर लिहिलं आहे की,'टीएमसी महिलांना सशक्त बनवत आहे. हे टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी आणि निवर्तमान बांकुरा महिला आमदार आहे. ज्या तिकिट न मिळाल्यामुळे निराश होत्या. लाज वाटायला पाहिजे.'


हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भापने तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपने या संबंधी म्हटलंय की, पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या अत्याचारावरील एकही घटना १० वर्षांत समोर आलेली नाही. एवढंच नव्हे तर ममता सरकारने प्रदेशात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना एनसीआरबीला दिलेले नाही.