कोलकाता : ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भाजपने पुन्हा एकदा जोरादर धक्का दिला आहे. तृणमूल आमदाराने १२ नगसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे नोवपारा येथील आमदार सुनील सिंह यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये तृणमूलमधून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तृणमूलमधून भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये हे तिसरे नेते आहेत. सुनील सिंह हे गरूलीया नगरपालिकेचेही अध्यक्ष आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, प्रदेश नेते मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्यासोबत १२ नगरसेवकांनीही भाजपचे कमळ हातात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपकडे इनकमिंग सुरुच आहे. दरम्यान, भाजपकडे आता भातपारा, कंचरापरा, नैहाती, हलीशहर आणि गरुलीया नगरपालिकेत बहुमत आहे. या ठिकाणी आतापर्यंत तृणमूल काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. या सत्तेला भाजपने हादरा दिला आहे. आमदार सुनील सिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे संपूर्ण बराकपूर मतदारसंघ भाजपमय झालाय. खासदार अर्जुन सिंह यांच्या अधिपत्याखाली हा मतदारसंघ आला आहे.



पश्चिम बंगालमधील जनतेला आता 'सबका साथ सबका विकास हवा' आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी यांचे सरकार आहे. आम्हाला देखील राज्यात तेच सरकार तयार करायचे आहे, तेव्हाच आम्हाला पश्चिम बंगालचा विकास करणे शक्य होईल, अशी प्रतिक्रीया प्रवेशानंतर  आमदार सुनील सिंह यांनी व्यक्त केली.