नवी दिल्ली : देशात 'वन नेशन, वन रेशन कार्ड' (One nation one ration card) योजना पुढील वर्षी १ जूनपासून सुरु होणार आहे. पण त्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रेशन कार्ड, आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. असं न झाल्यास रेशन कार्ड धारकांसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. रेशन कार्ड, आधार कार्डशी लिंक केल्यानंतर ग्राहक देशभरात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही रेशन दुकानातून सामान खरेदी करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी, 'वन नेशन, वन रेशन कार्ड' या योजनेमुळे रेशन दुकानदार ग्राहकांशी कोणतीही मनमानी करु शकणार नाही. यामुळे रेशन दुकानदाराला ग्राहकांचं समाधान करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. रेशन कार्डधारक कोणत्याही रेशन दुकानदाराकडून सामान खरेदी करु शकतील.


रेशन दुकानातून स्वस्त दरातील धान्य  घेणं हा ग्राहकांचा हक्क आहे आणि त्यांना सुविधा पुरवणं ही संबंधित दुकानदाराची जबाबदारी असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.


  


रामविलास पासवान यांनी, १ जून २०२० पासून संपूर्ण भारतात 'वन नेशन, वन रेशन कार्ड' लागू करण्यात येणार असून, या योजनेच्या अंमलबजावणीनंतर, रेशन कार्डधारक देशात कुठेही आपल्या वाट्याचे स्वस्त धान्य खरेदी करु शकत असल्याचं ते म्हणाले. देशात जवळपास १४ ते १५ राज्यातील विविध ठिकाणी याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.


देशातील विविध राज्यांत, रेशन कार्डसह ग्राहकांच्या आधारकार्डचा तपशील ऑनलाईन करण्यात आला आहे.