कपडे धुताना वॉशिंग मशिनमध्ये टाका बर्फाचे तुकडे; रिझल्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Washing Machine Hacks In Marathi: आज आम्ही तुम्हाला एख जबरदस्त टिप्स सांगणार आहोत. त्यामुळं तुमचं कामही वाचेल आणि मेहनतही
Washing Machine Hacks: कपडे स्वच्छ धुणे, त्यानंतर वाळत घालणे व इस्त्री करुन नीट कपाटात लावून ठेवणे हे काम खूपच किचकट असते. ऑफिसला जाणाऱ्या महिलांकडे इतका वेळदेखील नसतो. अनेकदा तर कपडे इस्त्री करण्यातच वेळ निघून जातोय. ऑफिसला जायच्या घाईगडबडीत इस्त्री करायला वेळच मिळत नाही. अशावेळी तसेच कपडे घालून ऑफिसला जाण्याची वेळ येते. मात्र, आज आम्ही तुम्हाला एक टाइम सेव्हिंग टिप सांगणार आहोत. त्यामुळं तुमची मेहनतही वाचेल आणि कामही. (Home And Decor Tips)
यासाठी तु्मच्याकडे वॉशिंग मशीन असायला हवी आणि काही बर्फाचे तुकडे या दोन वस्तूंमुळं तुमचं काम अगदी सोप्प होऊन जाईल. तुम्हीदेखील एकदा ही ट्रीक वापरुन पाहा.
इस्त्री करण्याची गरजच भासणार नाही
मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर तुम्ही ते ड्रायरमध्ये सुकवण्यासाठी टाकता. मात्र त्यापूर्वी त्यात कपडे सुकवण्यासाठी टाकल्यानंतर त्यात थोडे बर्फाचे तुकडे टाका. त्यानंतर जेव्हा तुम्ही ड्रायरमधून कपडे काढाल तेव्हा कपडे चुरगळलले नसतील. त्यामुळं तुम्हाला कपडे जास्तवेळ इस्त्री करायला लागणार नाही.
ड्रायरमध्ये टाका बर्फ
ड्रायरमध्ये बर्फ टाकल्यानंतर कपडे चुरगळत नाहीत. त्यामागचे कारण म्हणजे, ड्रायरचे तापमान वाढल्यानंतर बर्फाचे तुकडे वितळतात व त्यातून वाफ निर्माण होते. त्यामुळं कपडे जास्त चुरगळत नाहीत.
किती बर्फ वापराल
वॉशिंग मशीनची ही ट्रिक वापरण्यापूर्वी ही गोष्टदेखील लक्षात घ्या. ड्रायरमध्ये तुम्हाला खूपजास्त बर्फ टाकण्याची गरज नाहीये. बेस्ट रिझल्टसाठी कपड्यांसोबत तीन आइस क्यूब टाका. त्यानंतर दहा मिनिटे ड्रायर चालु ठेवा.
ही ट्रिक ट्राय करा
जर तुमच्याकडे कपडे सुकवण्याची मशीन नसेल तर तुम्ही इस्त्री न करताही कपड्यांच्या घड्या काढू शकता. त्यासाठी व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण तयार करुन घ्या. त्यांनतर कपडे हँगरला लटकवा व ते मिश्रण जिथे कपडे चुरगळलेले आहेत तिथे स्प्रे करा. असे केल्याने जेव्हा कपडे सुकतील तेव्हा त्यावर अजिबात घड्या दिसणार नाहीत.