तुमच्या जून्या कंपनीचा फंड नव्या EPF अकांऊटमध्ये ट्रान्सफर होत नाहीये? मग करा `हे` काम, काम होईल सोप्पे...
तूमचा EPFO अकांऊट तुमच्या जुन्या UAN नंबरावरून तयार करता येतो.
EPFO Account Merge: तूम्ही जर कुठल्या प्रायव्हेट कंपनीत नोकरी करताय तर तुम्हाला EPFO अकांऊटबद्दल नक्कीच माहिती असेल. प्रायव्हेट कंपनीत काम करताना कर्मचाऱ्यांना UAN त्यांचा क्रमांक मिळतो, ज्याद्वारे ते त्यांच्या EPFO अकांऊटशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. तुम्ही नोकरी बदलणार असाल तर नक्कीच तूम्हाला तूमचा EPFO अकांऊट तुमच्या जुन्या UAN नंबरावरून तयार करता येतो.
परंतु जुन्या कंपनीचा जो काही फंड असेल तो त्या नव्या अकांऊटशी जोडता येत नाही. यासाठी तुम्ही काय करू शकता तर तुम्ही EPFO च्या वेबसाईटवर जाऊन आपले नवे आणि जुने अकांऊट एकत्र म्हणजे merge करू शकता. अकांऊट merge केल्यानंतर तूम्हाला तूमचा सगळा फंड एकाच ठिकाणी दिसू शकतो.
कसे कराल अकांऊट merge?
- तुमचे दोन्ही अकांऊट एकत्रित करण्यासाठी तुम्हाला प्रथम EPFO वेबसाइटवर जावे लागेल.
- वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला services हा पर्याय दिसेल तो तूम्ही निवडा. निवडावा लागेल आणि
- ONE EMPLOYEE- ONE EPF अकांऊट यावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या समोर एक form येईल. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. UAN आणि Present member ID टाका.
- मग OTP टाकून सर्व process पुर्ण होईल. OTP enter केल्यावर तुम्हाला तुमचे जूने EPF अकांऊट दिसेल. तेव्हा notice स्विकारा आणि submit वर क्लिक करा. ही संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे अकांऊट merge झालेले दिसेल.
https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर जाऊन UAN नंबर आणि पासवर्ड वापरून तुम्ही तूमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता. तुम्ही तुमच्या अकांऊटशी संबंधित माहिती EPFO अकांऊटमधील तुमच्या नोंदणीकृत क्रमांकाद्वारे सहज मिळवू शकता. EPFO कडून missed call सेवा देखील चालवली जाते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरच अकांऊटमधील माहिती मिळू शकते. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर missed call द्या.