नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे की नाही असा प्रश्न ग्राहकांना उपस्थित होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या चढ-उतारामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत आहेत. . कधी सोन्याचे दर वाढतात तर कधी अचानक किंमतीत घट होते. अशीच स्थिती चांदीची देखील आहे. या महिन्यात सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दिवसाच्या सुरूवातीला सोन्याच्या दरात 10 रूपयांची घट नोंदवण्यात आली असून गुरूवारी सोन्याचे दर 330 रूपयांनी कमी झाले होते. त्यामुळे आज १० ग्रॅम सोने खरेदीसाठी करण्यासाठी ग्राहकांना  47 हजार 790 रूपये मोजावे लागत आहे. 



Good Returns वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 22 कॅरेट सोन्यासाठी 47 हजार 790 हजार रूपये मोजावे लागत आहेत. तर 24 कॅरेट सोन्यासाठी 48 हजार 790 रूपये मोजावे लागत आहे.