सदाबहार शेअर | कॅश मार्केटमधील हे दोन दमदार शेअर; एक्सपर्टचा शॉर्टटर्मसाठी खरेदीचा सल्ला
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवायचा असेल तर उत्तम शेअरची निवड करणे महत्वाचे असते
मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवायचा असेल तर उत्तम शेअरची निवड करणे महत्वाचे असते. त्यामुळे रिसर्च करणे गरजेचे असते. आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत, एक्सपर्टने रिसर्च केलेले शेअर्स ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भरघोस परतावा मिळवू शकता.
सेठी फिनमार्टचे एमडी विकास सेठी यांनी कॅश मार्केटमधील दोन दमदार शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारात नफा कमावण्यासाठी तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता. ते दोन शेअर आहेत,
Summit Securities आणि Sasken Tech
जाणून घ्या या दोन शेअरच्या बाबतीत...
Sasken Tech वर एक नजर
Sasken Tech ही Midcap IT मधील दमदार कंपनी आहे. ही कंपनी इंजिनिअरिंग प्रोडक्ट आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्विसेस प्रदान करते. ही कंपनी ऑटोमेटिव सेक्टर, सेमी कंडक्टर सेक्टरला प्रोडक्ट्स देत असते.
Sasken Tech Buy call
CMP 1335
Target 1360
SL 1300
कंपनीचा परफॉमन्स
विकास सेठी च्या मते, फॉर्च्यून 500 कंपन्यांमध्ये 100 कंपन्या या कंपनीचे क्लाइंट आहेत. कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. जून तिमाहीमध्ये कंपनीचे निकाल दमदार होते. कंपनीला 34 कोटींचा नफा झाला होता.
Summit Securities buy call
CMP 721
Target 750
Stop Loss 685
विकास सेठी य़ांनी Summit Securities वर खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की कंपनी हर्ष गोयंका यांची होल्डिंग कंपनी आहे. कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत तसेच शॉर्ट टर्म साठी ही कंपनी चांगला रिटर्न देऊ शकते.