Today Gold-Silver Rate: येत्या काही दिवसांमध्ये दिवाळी येत आहे. अशातच सोने-चांदी (Gold-Silver Price) खरेदी करण्याचा कल देखील वाढला आहे. मात्र दिवाळीमध्ये दागिन्यांच्या विक्रीत वाढ होण्याच्या अंदाजाने सराफ व्यावसायिक आणि साठेबाजांनी सोने खरेदी वाढली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे. मागील आठवड्यात सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली होती. जाणून घ्या आज सोने-चांदीचे दर... (today gold silver price hike in maharashtra )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचे सोन्या-चांदीचे भाव


गेल्या काही दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही (Gold Silver Rate) सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,450 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,670 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 553 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 55,300 रुपये प्रतिकिलो होती. 


तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव


- मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,450 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,670 प्रति 10 ग्रॅम आहे.


- पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,480 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,700 रुपये असेल. 


- नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,480 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,700 रुपये इतका असेल. 


- नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 45,480 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 50,700 रुपये आहे.


- चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 554 रुपये आहे.


वाचा : गाडीची टाकी भरण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 


या अॅपवरून सोने तपासा


सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.