Gold-silver खरेदी करताय? मग जाणून घ्या आजचे दर
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. याच मुहूर्तावर सोने (Gold) किंवा चांदीची (Silver) खरेदी केली जाते. म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण ...
Gold-Silver Price : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. याच मुहूर्तावर सोने (Gold) किंवा चांदीची (Silver) खरेदी केली जाते. म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात सध्या प्रचंड अस्थिरता दिसून येत होती. मात्र आज सोन्याचा दर स्थिर असून चांदीचे दर घसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे.
जन्माष्टमीनिमित्त अनेक जणांचा सोने खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे सोने चांदीच्या दरावर सर्वांचे लक्ष असणार. आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,900 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,250 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 567 रुपये आहे.
24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या.
चेन्नई - 52,770 रुपये
दिल्ली - 52,400 रुपये
हैदराबाद - 52,250 रुपये
कोलकत्ता -52,250 रुपये
लखनऊ - 52,400 रुपये
मुंबई - 52,250 रुपये
नागपूर - 52,280 रुपये
पूणे - 52,280 रुपये
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते. तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
हॉलमार्क (Hallmark)
सोने खरेदी करताना लोकांनी हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.