Today Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या (Gold-Silver Price) दरात अस्थिरता दिसून येत होती.  मात्र आज सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज जास्त पैसे मोजावे लागतील. कारण सोने-चांदीच्या (Gold-Silver Price)  दरात आज वाढ झाली आहे.  आज 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 46,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,890 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 542 रुपये आहे. (gold silver price update 9 september 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.


चेन्नई - 51,600 रुपये


दिल्ली - 51,040 रुपये


हैदराबाद - 50,890 रुपये


कोलकत्ता - 50,890 रुपये


लखनऊ - 50,040 रुपये


मुंबई - 50,890 रुपये


नागपूर - 50,930 रुपये


पूणे - 50,930 रुपये


सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी


सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ ( Bureau of Indian Standards ) द्वारे हॉल मार्क (hallmark) दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.


हॉलमार्क (Hallmark)


सोने खरेदी करताना सोन्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. Hallmark चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते