तीन दिवसांनंतर सोने आणि चांदीच्या दरांत घट
जाणून घ्या दर
नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरांत सतत वाढ होताना दिसत होती. पण आता तीन दिवसांनंतर सोन्याच्या आणि चांदीच्या दरांत घट झाली आहे. अमेरिकन डॉलरमध्ये होत असलेल्या बदलानंतर देखील सोने आणि चांदीच्या दरांत घसरण झाली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे आणि चांदीचे दर उतरले आहे. दरम्यान मागील काही काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर स्थिर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या धातूंमध्ये गुंतवणूक करायला हवी की नको असा प्रश्न ग्रहकांच्या मनात उपस्थित होत आहे.
आज सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५१ हजार ३९१ रूपये आहे तर चांदीचे दर ६७ हजार ७९८ रूपयांवर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे परदेशी बाजारांमध्ये सोन्याचे दर १,९५४.४२ डॉलर प्रति औंस आहेत. तर चांदी २७ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.
बीएन वैद्य आणि असोसिएट्सचे (B.N. Vaidya and Associates) भार्गव वैद्य (Bhargava Vaidya) यांच्या सांगण्यानुसार, सध्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये चढ उतार होत आहेत, त्यामुळे सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. आता सोन्यात गुंतवणूक केल्यास भविष्यात याचा तुम्हाला फायदा होवू शकतो असं देखील ते म्हणाले.