Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर
Gold Price Today : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 1,079 रुपयांनी वाढून 56,748 रुपयांवर पोहोचला आहे.
Gold Price Today On 13 March 2023 : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today) चढ-उतार होत आहे. आज, सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी सोन्याचे दर 56,700 च्या पोहोचले आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,079 रुपयांनी वाढून 56,748 रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचे दर 55,669 रुपयांवर बंद झाला होता. सोन्यासोबत चांदीच्या (Gold Silver Price Today) दरातही वाढ झाली आहे. आज चांदीचा दर 1,639 रुपयांनी वाढून 66,430 रुपयांवर पोहोचला. गेल्या शुक्रवारी संध्याकाळी चांदीचा दर 63,430 रुपयांवर बंद झाला होता.
सोने महागले
आज (13 मार्च ) सोन्याचे दर 55,748 रुपये आहे. तर त्याच वेळी 22 कॅरेट सोन्याचे ज्यामध्ये बहुतेक दागिने बनवले जातात त्यातही वाढ झाली. 22 कॅरेट सोन्याचा दर 51,981 रुपये आहे. तुम्हीही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दर नक्की तपासा....
मेटल | 13 मार्च दर (रुपये/10 ग्राम) | 10 मार्च दर (रुपये/10 ग्राम) | दरामधील बदल (रुपये/10 ग्राम) |
Gold 999 (24 कॅरेट) | 56748 | 55669 | 1,079 |
Gold 995 (23 कॅरेट) | 56521 | 55446 | 1,075 |
Gold 916 (22 कॅरेट) | 51981 | 50993 | 988 |
Gold 750 (18 कॅरेट) | 42561 | 41752 | 809 |
Gold 585 ( 14 कॅरेट) | 33197 | 32566 | 631 |
Silver 999 | 63430 Rs/Kg | 61791 Rs/Kg | 1,639 Rs/Kg |
मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
वाचा: Covid आणि H3N2 व्हायरसमध्ये वारंवार हात धुणे महत्वाचे का?
अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.