Gold-Silver Price Today: भारतीय सराफा बाजारात मंगळवारी सकाळी सोन्या-चांदीच्या (gold silver rate) दरात वाढ दिसून आली. सोने-चांदीच्या किंमतींतही गेल्या आठवडाभर अस्थिरता दिसून येत होती. मात्र काल (22 नोव्हेंबर) आठवड्याची सुरूवात ग्राहकांसाठी चांगली झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोमवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी 52,255 रुपये झाली आहे. त्याचवेळी 916 शुद्धतेचे सोने आज 48058 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 39,349 रुपये झाली आहे. त्याचवेळी 585 शुद्धतेचे सोने महाग होऊन आज 30,692 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 61291 रुपये झाला आहे.


सोन्या-चांदीच्या दरात काय बदल झाला?


सकाळी आणि संध्याकाळी सोन्या-चांदीच्या दरात बदल दिसून येत आहेत. सकाळच्या ताज्या अपडेटनुसार, 999 आणि 995 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने आज 59 रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने 54 रुपयांनी, 750 शुद्धतेचे सोने 44 रुपयांनी आणि 585 शुद्धतेचे सोने 34 रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे, एक किलो चांदीची किंमत आज 849 रुपयांनी महागली आहे.


वाचा : आता मोफत मिळवा Amazon Prime, Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन; कसं ते जाणून घ्या


24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय फरक आहे?


24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हटले जाते. त्यात इतर कोणत्याही धातूची भेसळ नाही. त्याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हटले जाते. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोने असते. आणखी 8.33 टक्के इतर धातूंचा समावेश आहे. 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोने असते. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोने असते आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.5 टक्के शुद्ध सोने असते.


मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत


केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी ibja द्वारे दर जारी केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.com ला भेट देऊ शकता.