मुंबई : सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये बिकट परिस्थिती आहे. त्यातच आज देशभरात स्वातंत्र दिवस साजरा होत आहे. अशातच हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील काही राज्यांत ऑरेज अलर्ट जारी केला आहे. मान्सूनच्या (Monsoon News) दुसऱ्या टप्प्यात अनेक राज्यांमध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. (Maharashtra Rain)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Weather Update) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय भारतीय हवामान विभागाने, पालघर ठाणे नासिक जळगाव आणि कोल्हापूर या विभागाला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.  त्याचवेळी हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार येत्या 72 तासांत देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


या राज्यांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज 


हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागात हवामान खात्याने पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर  औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत भारतीय हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांना देखील भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.