नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात तेल कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. याआधी 27 फेब्रुवारी रोजी पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक स्तरावर पोहोचले होते. देशाच्या राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर  91.17 रूपयांवर पोहोचले असून डिझेल 81.47 रूपय प्रति लिटरवर पोहोचले आहेत. दिल्लीतच नाही तर सर्वच शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे तर ऐतिहासिक  स्तरावर पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात  पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 16 वेळा वाढ करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत पेट्रोलचे दर 4.47 रूपयांनी वाढले असून डिझेल 4.52 रूपयांनी महागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे इतर वस्तू देखील महागल्या आहेत. सतत महागाई वाढत असल्यामुळे नारिकामध्ये नाराजीचे वातावरण आहे. 


जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर 
- मुंबईमध्ये आज  पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. आज मुंबईत पेट्रोल 97.57 रूपये तर डिझेल 88.60 रूपये प्रति लिटर आहे. 
- कोलकातामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. कोलकातामध्ये आज पेट्रोल 91.35 रूपये आहे. तर डिझेलसाठी 84.35 रूपये मोजावे लागत आहेत. 
- दिल्लीमध्ये देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झालेले नाहीत पेट्रोलसाठी 91.17 रूपये मोजावे लागत आहेत तर डिझेलसाठी  81.47 रूपये मोजावे लागत आहेत.



पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.