Petrol Diesel Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासून क्रुडच्या किमतीत चढ-उतारांचा सुरू आहे. परिणामी सुमारे साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे (petrol diesel) दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र महाराष्ट्र आणि मेघालय वगळता इतर सर्व राज्यांतील तेलाच्या दरात साडेतीन महिन्यांपूर्वी बदल करण्यात आला होता. त्यावेळी केंद्र सरकारने तेलाच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला होता.


कच्च्या तेलाचे आजचे भाव
मेघालयात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दीड रुपयांनी वाढ झाली होती. मात्र महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले होते. कच्च्या तेलाची घसरण होत असून प्रति बॅरल $90 च्या खाली व्यापार होत आहे. सोमवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $88.29 वर पोहोचली. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 94.60 वर घसरल्याचे दिसून आले.


यापूर्वी 22 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर लगेचच काही राज्य सरकारांनीही व्हॅट कमी केला.


तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर 


- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिट