Petrol Diesel Price on 7 May 2023 : आज साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने तुम्ही जर गाडीने बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील (Petrol and Diesel Price) कोणताही बदल दररोज सकाळी 6 वाजल्यापासून लागू केला जातो. विविध निकषांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक राज्यानुसार बदलतात. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सह सार्वजनिक क्षेत्रातील OMC आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमती आणि विदेशी चलन दरांच्या अनुषंगाने दररोज त्यांच्या किमती सुधारतात. याचपार्श्वभूमीर राज्यातील काही भागात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


पेट्रोलच्या किमतीत कराचा वाटा 50% ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी मार्चमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर देशातील इंधनाच्या दरात लक्षणीय वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले. तर सध्या देशात पेट्रोलची सरासरी किंमत 100 रुपये प्रति लिटर आहे. पण एक लिटर पेट्रोलच्या किमतीत कराचा वाटा जवळपास 50% आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? 


तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर 


पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर झाले असून मुंबईत, दिल्लीत, कोलकत्ता आणि चेन्नई भागत पेट्रोलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत (Mumbai Petrol Rate) आज पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरने विकले जाणार आहे. त्याचबरोबर दिल्लीतर पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने, कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर, तर चेन्नईत पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटरने विकले जाणार आहे.  


भारत इंधनासाठी किती पैसे देतो?


एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकार तुमच्याकडून किती कर वसूल करतात हे तुम्हाला माहितीय का? समजा जर, 7 मे 2023 रोजी दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी 96.72 रुपये खर्च करावे लागले. यामध्ये 35.61 रुपये कराचा समावेश होता, त्यापैकी 19.90 रुपये केंद्र सरकारकडे आणि 15.71 रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत जातात. याशिवाय एक लिटर पेट्रोल डीलरचे कमिशन 3.76 रुपये आणि वाहतुकीसाठी 0.20 पैसे जोडले जाते. 


पेट्रोल-डिझेलचे दर तपासा


तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड 9224992249 या नंबरवर पाठवावा लागेल.