Share Market : शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पडझडीचे संकेत दिसून आले आहेत. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 652 अंकांनी घसरून 59,646 वर बंद झाला, तर निफ्टी 198 अंकांनी घसरून 17,758 वर बंद झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक बाजाराच्या नकारात्मक भावनेचा परिणाम गुंतवणूकदारांना दिसू शकतो आणि मागील सत्राप्रमाणे बाजारात विक्रीचा जोर कायम राहील. अशा स्थितीत या आठवड्यात सेन्सेक्स 60 हजारांच्या खाली राहू शकतो. यामध्ये कोटक महिंद्रा बँकेचे  सर्वाधिक 2.5 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. त्याच वेळी, डॉ रेड्डीजचा शेअर 0.70 टक्क्यांनी वाढला होता. एसबीआय लाइफ, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, हिंदुस्तान लिल्व्हर आणि एलटी हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. दुसरीकडे, कोटक बँक, ग्रासीम, हिंडाल्को, टाटा स्टील आणि ओएनजीसी सर्वाधिक तोट्यात होते.  


आशियाई बाजारही घसरले
आज सकाळी उघडलेल्या आशियातील बहुतांश शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून येत आहे. सिंगापूर स्टॉक एक्स्चेंज 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे, तर जपानचा निक्केई 0.49 टक्क्यांनी घसरला आहे. तैवानचा शेअर बाजार 0.48 टक्क्यांनी घसरला आहे. याशिवाय, दक्षिण कोरियाच्या कॉस्पीमध्ये 0.84 टक्के तोटा दिसत आहे. आज फक्त चीनचा शांघाय कंपोझिट 0.32 टक्क्यांनी वर आहे.  गेल्या ट्रेडिंग सत्रात घसरण होऊनही विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात आपले भांडवल ठेवले. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 1,110.90 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र याच कालावधीत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही 1,633.21 कोटी रुपयांचे शेअर्स विकले परिणामी बाजारात घसरण झाली.