मुंबई : मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना पुन्हा एकदा विक्रमी आकडा ओलांडला आहे. दर दिवशी सोन्याच्या दरांत ठराविक किंमतीनं वाढ होत असतानाच मंगळवारी मात्र या दरांमध्ये विक्रमी तेजी आल्याचं पाहायला मिळालं. सराफा बाजारात सोन्याला आलेली ही झळाळी पाहता मागील चोवीस तासांत हे दर तब्बल ३ हजारांनी वाढले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिणामी मुंबईमध्ये सध्याच्या घडीला हे दर ५४ हजारांच्याही पलीकडे पोहोचले आहेत. कोरोना व्हायरसमुळं लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नंतरच्या टप्प्यामध्ये ठराविक कालावधीच्या अंतरानं व्यापार सुरु करण्यात आले. पण, अद्यापही संपूर्ण व्यापार सुरु झालेले नाहीत. ज्यामुळं शेअर बाजारत बरीच उलथापालथही सुरु आहे. पण, या साऱ्यामध्ये सराफा बाजारात सोन्याचे दर मात्र नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. 


मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरांनी ५४ हजारांचा आकडा ओलांडला असतानाच चांदीचे दरही गगनाला भिडू लागले आहेत. प्रति किलोसाठी चांदीचे दर ७० हजारांवर पोहोचले आहेत. मागील वर्षभराच्या कालावधीत सोनं आणि चांदीच्या दरामध्ये झालेली ही विक्रमी वाढ आहे. 



मुख्य म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये दरांमध्ये असणारी ही तेजी अशीच कायम अलेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता सोनं खरेदी करताना सतारासार विचार केल्यावाचून गत्यंतर नाही हेच खरं.