नवी दिल्ली : गेल्या सहा दिवसांपासून पेट्रोलचे दर सतत वाढताना दिसत आहेत. मंगळवारी पेट्रोलच्या दरांत ११ पैश्यांनी वाढ झाली. तर बुधवारी पेट्रोलच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. तर आज डिझेलचे दर देखील स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑयल (IOC), भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लि. (BPCL) आणि हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लि. ने (HPCL) आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतींमध्ये उलथापालथ झाल्यानंतर देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत आहेत. संपूर्ण देशात मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत चालकांना १ लिटर पेट्रोलसाठी ९० रूपये मोजावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला चांगलीच कात्री लागत आहे.


आज राजधानी दिल्लीत डिझेल ७३.५६  प्रति लिटर प्रमाणे मिळत असून पेट्रोल ८१.७३ रुपये झाला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव ८८.३९ रूपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा भाव ८०.११ रुपये आहे.


पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.