मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या खिश्याला चांगलीच कात्री लागत आहे. आतातर पेट्रोलच्या दराने सर्व रेकॅार्ड मोडीत काढले आहेत. आज पेट्रोलचे दर गेल्या वर्षभराच्या तुलनेत अधिक आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात १० पैश्यांनी वाढ झाली आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल २६ पैसे प्रती लिटर महाग झालं आहे. त्याचबरोबर चेन्नईमध्ये डिझेलचे दरात १५ पैश्यांची वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी दिल्लीत पेट्रोलचे दर ७४.६६ रूपये प्रती लिटर होते. इंडियन ऑइलच्या संकेतस्थळावर मंगळवारचे पेट्रोल, डिझेलचे दर कळवले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये क्रमश: पेट्रोलचे दर ७४.७६ रूपये, ८०.४२ रूपये. ७७.४४ आणि ७७.८८ प्रती लिटर आहेत. 


तर, या चार शहरांमध्ये डिझेलचे दर क्रमश: ६५.७३ रूपये, ६८.९४ रूपये, ६४.१४ रुपये आणि ६९.८२ रूपये प्रती लिटर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे प्रवाश्यांच्या खिश्याला कात्री लागत आहेत. 


पेट्रोल-डिझेलच्या दरात रोज चढ-उतार होत असतात. पेट्रोल-डिझेल नवा दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू करण्यात येतो. आपापल्या  शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घरबसल्याही जाणून घेता येऊ शकतात. केवळ एका एसएमएसवर (SMS) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची माहिती मिळू शकते. सकाळी ६ वाजल्यानंतर ९२२४९ ९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवून किंमतींची माहिती मिळू शकते.