Top 5 Jobs | शिक्षणासह कमाई कशी करावी? हे पाच जॉब्स करतील आर्थिक मदत, भविष्यात होईल फायदा
वेळ ही खूप मौल्यवान गोष्ट आहे. तुम्हाला खरंच एक यशस्वी व्यक्ती बनायचे असेल तर वेळाचा सद्उपयोग करायला हवा.
मुंबई : वेळ ही खूप मौल्यवान गोष्ट आहे. तुम्हाला खरंच एक यशस्वी व्यक्ती बनायचे असेल तर वेळाचा सद्उपयोग करायला हवा. कॉलेजच्या अभ्यासक्रमादरम्यान आपण अशा स्टेजला असतो ज्यावेळी आपल्याकडे रिकामा वेळ भरपूर असतो. बसणे किंवा मॉल फिरण्याव्यतिरिक्त पैसेसुद्धा कमावता येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला 9 तास जॉब करण्याची गरज नाही. असे काही कामं करता येईल ज्यामुळे तुम्ही अभ्यास करता करता पैसेदेखील कमाऊ शकता.
प्रोडक्ट रिसेलिंग
अनेक होलसेल उत्पादक आपल्या कंपनीची उत्पादनं विक्रीसाठी चांगल्या व्यक्तींच्या शोधात असतात. आपण ते विकत घेऊन इंटरनेट, सोशल मीडिया, पारंपारिक माध्यमांतून रिटेल बाजारात विकून नफा मिळवू शकतो.
ब्लॉगिंग
ब्लॉग सुरू करण्यासाठी कमीत कमी गुंतवणूकीची गरज असते. तुमच्याकडे लिहण्याची कला असेल तर, थोड्याफार गुंतवणूकीमध्ये ब्लॉगिंग सुरू करता येऊ शकते. सुरूवातीच्या दिवसांमध्ये यामध्ये जास्त पैसा नसतो. परंतु काही कालावधीनंतर ब्लॉगिंगचे पैसे मिळणे सुरू होतात.
रिफ्युज रिम्यूवल
बहुतांष कंपन्यांना आपल्या संपत्तीवरून कचरा हटवण्यासाठी लोकांची गरज असते. जर तुमच्याकडे काही स्वस्त उपकरण आणि एखादा जूना ट्रक खरेदी करण्याइतपत पैसे असतील तर स्थानिक लोकांच्या संपर्कातून हा छोटा व्यवसाय करू शकतात.
फ्रिलांन्सिंग
फ्रिलांन्सिंग अनेक क्षेत्रांमध्ये करता येऊ शकते. यात तुम्ही तुमच्या प्रतिभेचा कौशल्याचा वापर करून ग्राफिक डिझाइन, वेब डिझाइन, सोशल मीडिया हँडलर अशी कामे घेऊ शकतात. जेणेकरून डिग्री घेतल्यानंतर तुम्ही फ्रेशर न राहता. अनुभवी कौशल्य असलेली व्यक्ती असता.
प्रोडक्शन ऑफ हॅंडमेड प्रोडक्ट ऍंड सेलिंग
तुम्ही क्रिएटीव्ह आहात तसेच नवीन गोष्टी बनवण्याचा तुम्हाला छंद आहे. तर याला तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये बदलू शकता. तुम्ही आभूषण, कलाकृती, कपडे बनवून ऑनलाईन विकू शकता.