जम्मू-काश्मीर : अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर बशीर लष्करी ठार झाला आहे. या एनकांउटरमध्ये बशीरसोबत आजाद ताता (मलिक) ला पण ठार केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्यात या दहशतवाद्यांनी १६ जूनला दक्षिण काश्मीरमधल्या अचाबल भागामधील एका पोलीस ठाण्यात सहा पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. शोध मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर सुरुवातीला गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी सामान्य नागरिकांचा उपयोग 'मानवी ढाल' म्हणून करत आहेत.


सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ४४ वर्षीय ताहिरा असे मृत महिलेचे नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोळीबाराच्या दरम्यान ४४ वर्षीय ताहिरा यांना गोळी लागली होती. तिला लगेचच रूग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.