मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिला आक्रमक होत असल्याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओंवरून महिलांवर टीका देखील होत आहेत. सोमवारी लखनऊच्या मुलीचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत असताना आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उत्तराखंडातील नैनिताल पोलिसांसोबत गैरवर्तण करणाऱ्या एका तरूणीच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. एका महागड्या लक्झरी कारमधून आपल्या मित्रांसोबत बाहेर आलेल्या मुलीने पोलिसांना धमकी दिली आहे. एवढंच नव्हे तर पोलिसांसोबत चुकीचं वर्तन करत त्यांना लाथ मारली आहे. 




ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी तरूणीला गाडीवर असलेली काळी काच काढण्यास सांगितलं. या गोष्टीवरून तरूणीने पोलिसांशी गैरवर्तणूक केलं. यावेळी तल्लीताल पोलिस ठाण्यातील SI राजकुमारी सिंघानिया मालरोड परिसरात कॉस्टेंबलसोबत गाड्या चेकिंग करत होते. त्यावेळी एक काळ्या काचा लावलेली कार तेथून गेली. पोलिसांना तीला हटकलं.


तरूणीने पोलिसांसोबत केलं गैरवर्तण 


या प्रकरणात, कारमधील मुलगी मागे वळली आणि बाहेर आली आणि ड्युटी करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याशी भांडायला लागली. रस्त्यावरच दोघांमध्ये वाद झाला. जेव्हा ती पोलिसांशी गैरवर्तन करत होती, तेव्हा कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला. कारमध्ये बसलेले पर्यटक पोलिसांकडून पैसे घेतल्यानंतर कार सोडल्याबद्दल बोलत होते. परंतु गाडीच्या खिडक्यांवरील काळी फिल्म काढण्याच्या प्रकरणावर पोलीस ठाम राहिले. या दरम्यान कारमधील मुलगी आणि तिच्या मित्रांनी पोलिसांना वर्दी काढण्याची धमकी दिली. अगदी हे प्रकरण वादाकडे वळलं.