नवी दिल्ली :  बिटकॉईनसारख्या फसव्या अमिशाला बळी पडू नका. यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे ही मोठी जोखीम ठरू शकते. खास करून रोखीने गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना अचानकपणे मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना अत्यंत सावध असणे गरजेचे आहे, असा इशारा अर्थ मंत्रालयाने दिला आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या एका प्रतिक्रियेत हा इशारा देण्यात आला आहे.


केवळ डिजिटल स्वरूपातच स्टोर होते क्रिप्टोकरन्सी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हर्च्युअल करन्सीला डिजिटल स्वरूपातच स्टोर करता येऊ शकते. त्यामुळे यात हॅकींग, पासवर्ड विसरणे, व्हायरस अॅटॅक यांसारख्या गोष्टीचीच सातत्याने भीती असते. त्यामुळे नेमका याच गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करत अर्थमंत्रालयाने म्हटले ऑहे की, बिटकॉईन किंवा इतर कोणत्याही क्रिप्टोकरंन्सीची किंमत ही नेहमी शक्यतांवर अवलंबून असते. यात सातत्याने आणि अचानकपणे चढ उतार पहायला मिळतो, असेही अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.


बिटकॉईनला कायदेशी आधार नाही


दरम्यान, बिटकॉनसह इतर व्हर्च्युअल करन्सीमध्ये गेल्या काही दिवसात मोठी वृद्ध पहायला मिळत आहे. पण, वास्तव असे की, क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल मुद्रा असते. वास्तवात अशा प्रकारची कोणतीच मुद्रा पहायला मिळत नाही. याचा वापर केवळ डिजिटल व्यवहारांसाठीच केला जातो. अर्थ मंत्रालयाचे म्हणने असे की, अशा प्रकारच्या करन्सीला कोणत्याही प्रकारचा वास्तव अधार नाही. तसेच, त्यापाठीमागे कोणत्याही संपत्तीचा आधारही असत नाही. दरम्यान, यापूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी लोकसभेत सांगितले की, सरकार अशा पद्धतीच्या करन्सीबाबत एक एक समिती नेमणार असून, ही समिती जगभरातील देशांमध्ये बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीबाबतच्या नियमांना कायदेशीर अभ्यास करने. त्यानंतर भारतातही असाच कायदेशिर ढाचा तयार करण्यात येईल.


आरबीआयनेही दिला इशारा


दरम्यान, बिटकॉईनबाबत आरबीआयनेही इशारा दिला आहे की, 'गेल्या काही काळापासून व्हर्च्युअल करन्सीच्या मूल्यामध्ये अप्रत्यक्षरित्या वाढ आणि इनिशियल कॉईन ऑफरिंग (ICO) यांच्यात मोठी वृद्ध झाली आहे. ही वृद्धी पाहून आम्हाला चिंता वाटते. महत्त्वाचे असे की, बिटकॉईन हा रिझर्व्ह बँक निर्धारीत करत नाही. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून बिटकॉईनचा भाव चांगलाच वधारला आहे. सध्या तो 11,000 डॉलरवर पोहोचला आहे.' 24 डिसेंबर 2013लाही आरबाआयने म्हटले होते की, 'व्हर्च्युअल करन्सीला वास्तवात कोणताही आधार नाही. तसेच, याची बाजारपेठेतील किंमत ही केवळ अंदाज आणि काही ठोकताळ्यांवर अधारीत असते. यापूर्वीही व्हर्च्युअल करन्सीमध्ये अनेक चढ-उतार पहायला मिळाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना आम्ही सतर्कतेचा इशारा देत आहोत', असेही आरबीआयने म्हटले आहे.