रेल्वेचे स्टेटस असे व्हॉट्सअॅपवर जाणून घ्या!
तुम्हाला ट्रेनचे लाईव्ह स्टेटस काय आहे हे व्हॉट्सअॅपवरही मिळणार आहे.
मुंबई : अनेक वेळा आपण रेल्वेन प्रवास करतो. मात्र, गाडी वेळेवर आहे की उशिरा, याची माहिती मिळत नाही. किंवा गाडी कोठे आली आहे. वेळेवर येईल का? याची सतत चिंता असते. मात्र, तुम्ही आता याची चिंता करु नका. कारण रेल्वे कोठे पोहोचलेय. उशिरा आहे की वेळेवर याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. तीही तात्काळ.
तुम्हाला त्या रेल्वेचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर याबाबत भारती रेल्वेने अर्थात 'आयआरसीटीसी'ने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. यासाठी भारतीय रेल्वेने 'मेक माय ट्रिप'सोबत भागीदारी केली असल्यामुळे ट्रेनचे लाईव्ह स्टेटस तुम्हाला मेसेंजरवरही मिळेल.
तुम्हाला ट्रेनचे लाईव्ह स्टेटस काय आहे हे व्हॉट्सअॅपवरही मिळणार आहे. गाडीचे पुढील स्टेशन कोणते आहे, कोणते स्टेशन येऊन गेले याचीही माहिती मिळेल. तुम्हाला यासाठी आता १३९ क्रमांक डायल करावा लागणार नाही, किंवा इतर कोणते अॅप बघावे लागणार नाही.
तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करा. जेणकेरुन नवीन व्हर्जन तुम्हाला मिळेल. व्हॉट्सअॅपवर माहिती जाणून घेण्यासाठी मेक माय ट्रिपचा ७३४९३८९१०४ हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करा. मेक माय ट्रिपचा क्रमांक व्हॉट्सअॅपमधून ओपन करा. ट्रेनचा नंबर त्यामध्ये टाईप करुन मेसेज सेंड करा. मेसेज पाठवताच तुम्हाला हवे असलेल्या ट्रेनचे स्टेटस मिळेल. तसेच याच पद्धतीने पीएनआर नंबर व्हॉट्सअॅपवर मेसेज करा. यामुळे तुम्हाला तुमच्या तिकिटाचे स्टेटसही मिळेल.