HOME लोन ट्रांसफर केल्यास होणार लाखोंचा फायदा
होम लोनमध्ये तुमचं इतकं होतंय नुकसान
मुंबई : अनामिका आणि त्यांचे पती जयंत यांनी एका NBFC (नॉन बँकिंग फायनान्स कॉरपोरशन) मधून 2016 मध्ये 27 लाखाचं कम्पोजिट होम लोन (प्लॉट पर्चेस+कंस्ट्रक्शन) घेतलं होतं. त्यांचं मासिक ईएमआय 26 हजार रुपए प्रति महिना होता. अडीच वर्षात त्यांनी 9 लाख रुपये भरले. (प्रिंसिपल + व्याज). त्यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांनी एक दिवस आपला होम लोन ट्रॅक रेकॉर्ड पाहिला. त्यात असं समोर आलं की, 9 लाख रुपये भरल्यानंतर ही त्यांच्या प्रिंसिपल रक्कमेतून फक्त 60 हजार रुपये कमी झाले आहेत. म्हणजेच त्यांनी फक्त व्याजच भरलं. त्यानंतर या दाम्पत्याने यातून मार्ग काढण्याचा विचार केला.
यातच एका बँकरने त्यांना लोन ट्रान्सफर करण्याचा सल्ला दिला. एका बँक अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं की, जर त्यांनी बँकेत लोन ट्रान्सफर केलं तर त्यांचे लाखो रुपये वाचतील. दाम्पत्याने लगेचच लोन ट्रान्सफर करण्याची तयारी सुरु केली.
या दाम्पत्याने फेब्रुवारी 2016 एनबीएफसी बँकेतून जवळपास लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हे जवळपास त्यांना 28 वर्ष भरायचं होतं. व्य़ाजदर 10.99 टक्के फिक्ड होता. या आधारावर त्यांना मासिक 26 हजार रुपये ईएमआय बसत होता. त्यांनी जेव्हा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तेव्हा अशा लक्षात आलं की त्यांनी अडीच वर्षात अधिक व्याजच भरल आहे. जर त्यांना हे लोन असंच सुरु ठेवलं असतं तर त्यांना 28 वर्षाच 60 लाख रुपये हे फक्त व्याजच भरावं लागलं असतं.
लोन ट्रान्सफर केल्यानंतर...
लोन ट्रान्सफर केल्यानंतर त्यांनी एका राष्ट्रीयकृत बँकेतून 8.85 टक्के व्याजाने लोन घेतलं. ईएमआय ठेवढाच होता. पण लोन भरण्याची मुदत 11 वर्ष कमी झाली.
किती झाला फायदा
एनबीएफसी मधून लोन घेतल्यानंतर त्यांना 28 वर्षात 60,15,800 रुपये भरावे लागले असते. पण लोन ट्रान्सफर केल्यानंतर त्यांचे 11 वर्ष कमी झाले. म्हणजेच ते 17 वर्ष झाले. आता त्यांना व्याजाच्या रुपात फक्त 25,30,402 रुपये म्हणजे जवळपास 35 लाख रुपये त्यांचे वाचले.