फक्त 5 मिनिटांत दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करा SBI अकाऊंट
जाणून घ्या पूर्ण प्रोसेस?
मुंबई : आपलं बँक अकाऊंट सेम ब्रांचमध्ये ट्रान्सफर करणं जरा धावपळीचंच काम असतं. एका ब्रांचकडून दुसऱ्या ब्रांचमध्ये सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जाणं. मग सगळं सब्मिट करणी ही एक वेळ खावू प्रोसेस असते. पण आता SBI ने ग्राहांकासाठी अवघ्या 5 मिनिटांत अकाऊंट कोणत्याही ब्रांचमध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा सुरू केली आहे.
SBI अकाऊंट कोणत्याही ब्रांचमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी फक्त 5 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. बँकेत फेऱ्या न घालता अगदी घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता. नवीन सुविधांच्या मार्फत अगदी एका आठवड्याच्या आत तुमचं अकाऊंट दुसऱ्या ब्राचंमध्ये ट्रान्सफर होण्याची पूर्ण ऑनलाईन प्रोसेस होणार आहे.
ऑनलाइन अकाऊंट ट्रान्सफर करण्याच्या अगोदर काही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. ही सेवा त्याच ग्राहकांना उपलब्ध आहे ज्यांनी केवायसी (नो योर कस्टमर) अपडेट केलं आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन प्रोसेस तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा मोबाइल नंबर रजिस्टर असणार आहे. तसेच 1 डिसेंबरपासून SBI ने रजिस्टर्ड नसलेले मोबाइल नंबरची बँकिंग सर्विस ब्लॉक केली आहे.
बँक ब्रांच बदलण्याची प्रक्रिया...
1. सर्वात अगोदर नेट बँकिंग लॉगिन करा. आपल्या खात्याच्या होम पेजवर 'ई-सर्व्हिस' टॅबवर क्लिक करा. 'ई-सर्व्हिस'सेक्शनमध्ये या आणि 'बचत खाते'दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला SBI चे उपलब्ध अकाऊंट दिसेल. तुम्ही जे खाते दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करू इच्छिता त्यावर क्लिक करा. त्यानंतर ज्या शाखेत ट्रान्सफर करायचे आहे त्याचे कोड टाका.
2. त्यानंतर 'गेट ब्रांच नेम' टॅबवर क्लिक करा. त्यानंतर शाखेचं नाव, शाखा कोडच्या खाली एका बॉक्समध्ये दिसेल. तिथून शाखा निवडा अन्यथा तुम्हाला शाखेचा कोड माहित असेल तर तो तेथे भरा. 'नियम आणि अटी' जाणून घेतल्यानंतर स्विकार करून सबमिट बटण दाबा.
3. सबमिट बटणवर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन शाखेचं नाव आणि कोड दिसेल. ज्यामध्ये तुम्ही तुमचं खातं ट्रान्सफर केलं आहे. पूर्ण तपशील एकदा तपासून घ्या त्यानंतर सर्व माहिती योग्य वाटल्यास कन्फर्म बटणवर क्लिक करा.
4. यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल. जेव्हा तुम्ही कन्फर्मवर क्लिक कराल तेव्हा नवीन पेज उघडेल.
5. त्यावर ट्रान्सफर कन्फर्मेशन मॅसेज, तुमची उपलब्ध शाखा आणि त्या शाखेची सर्व माहिती दिसेल ज्यावर तुम्ही तुमचं अकाऊंट ट्रान्सफर केलं आहे.
लक्ष असू द्या : जर तुम्हाला तुमची सर्व बँक खाती ट्रान्सफर करायची असल्यास CIF अनिवार्य आहे. CIF चा अर्थ कस्टमर इन्फॉर्मेशन फाइल ज्यामध्ये खातेधारकाची संपूर्ण खात्यांची माहिती असते.