Honeymoon Destination: सध्या लग्नसराईचा सिझन जोरदार सुरू आहे. अशावेळी हनिमून बुकिंगही (wedding season honeymoon bookings) फार जोरात होण्यास सुरूवात झाली आहे. तेव्हा सध्याच्या सिझनमध्ये आता हनिमूनला कुठे कुठे जाता येईल याचीच सगळ्या कपल्समध्ये चर्चा सुरू झाली आहे. कुणी भारतातील डेस्टिनेशन शोधत असतील तर कुठे आऊट ऑफ इंडिया असलेले आकर्षक लोकेशन (Location for honeymoon) शोधत असेल पण आम्ही तुम्हाला सांगतो की हनिमूनसाठी भारताबाहेरही जाण्याची आवश्यकता नाही कारण भारतातच तुम्ही या रोमांचकारी ठिकाणी तुमच्या हनिमूनसाठी जाऊ शकता. तुम्हाला त्या जागेचं नावं ऐकून कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल. (travel news try this wonderful location for honeymoon this season you will forget other locations)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त हनीमूनच नाही तर तुम्ही फक्त भटकंती करण्यासाठीही कुठे जात असाल तर नक्कीच या ठिकाणी जाण्याचा बेत आखू शकता. अनेकदा आपल्याला पैश्यांअभावी चांगल्या टूरला जाता येत नाही तर काहीवेळी कुठे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु ही जागा तुमच्या खिशाला परवडणारी म्हणजेच पॉकेट फ्रेन्डली आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत हे असे ठिकाण आहे जे तुम्हाला अगदी गोव्यासारखे वाटेल. हे ठिकाण आपल्या निसर्गरस्य सौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करतं. इथे तुम्हाला गोव्यासारखा (sea coast) समुद्रकिनारा पाहायला मिळतो. सोबतच येथे जंगल सफारी असून येथे तुम्ही हवा तेवढा वेळ काढू शकता. 


पिलीभीतमध्ये काय खास आहे?


पिलीभीतचा चुका बीच हनीमुन कपल्ससाठी सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे शारदा कालवा आहे. येथे खूप शांतता आहे. चुका तलाव 17 किलोमीटर लांब असून त्याची रूंदी 2.5 किलोमीटरपर्यंत आहे, अशी माहिती कळते. य़ेथे 15 नोव्हेंबरपासून पीलीभीत व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन क्षेत्र सुरू झाले आहे. यासाठी तुम्ही येथे दिलेल्या वेबसाइटवर ( https://pilibhittigerreserve.in/ ) जाऊन बुकिंग करू शकता.


चुका बीचला कसे जायचे?


जर तुम्हाला पिलीभीतला जायचे असेल तर नोव्हेंबर ते जून हा काळ यासाठी सर्वोत्तम आहे. येथे तुम्ही कॅम्प फायरचा (camp fire) आनंद देखील घेऊ शकता परंतु येथे जाण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती तुम्हाला करून घ्यावी लागेल. येथे दारू आणि मांसाहारावर पूर्णपणे बंदी आहे. याशिवाय येथे प्लास्टिकच्या वस्तू नेण्यास मनाई आहे. काही मर्यादित लोकांना राखीव व्याघ्र वनातून रात्री मुक्कामाची व्यवस्था मिळते.